Advertisements
चंद्रपूर : शहरात काल एक युवती कोरोना पोजीटिव्ह आढळली होती. त्यामुळं या युवतीच्या कुटुंबियांचे swab घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आता आला असून, या कुटुंबातील इतर सर्व पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळं प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. कोरोनाबधित युवतीवर चंद्रपुरात उपचार सुरू आहेत. ही युवती 9 तारखेला यवतमाळ इथून आपल्या आई आणि भावासह शहरात दाखल झाली. त्यानंतर तिचे 11 तारखेला swab घेण्यात आले. त्यात ती पोजीटिव्ह निघाली होती. चंद्रपुरात तिच्या रूपाने दुसऱ्या कोरोनाबधित रुग्णाची नोंद झाली. यापूर्वी 2 मे रोजी एक व्यक्ती बाधीत सापडला होता. त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत.