सीसीआय मार्फत कापूस खरेदी करा अन्यथा शेतकरी खाजगी खरेदी बंद करणार – माजी आमदार निमकर

0
113
Advertisements

राजुरा : संपूर्ण देश कोरोणाच्या संकटात असताना महाराष्ट्र राज्य सुद्धा लॉकडाउन आहे.परंतु सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याबाबत आदेश दिलेले असताना सुद्धा राज्यशासनाची यंत्रणा तसेच कापूस जिनरस यांचे स्तरावर योग्य सहकार्य लाभत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच साठून राहिलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमांनात आर्थिक पिळवणूक होत आहे.
सीसीआय च्या कोरपना तालुक्यात ३ व राजुरा तालुक्यात २ जिन प्रमाणेच याव्यतिरिक्त इतर जीनरसना सुद्धा सीसीआय ची कापूस खरेदी करणे बंधनकारक करण्यात यावे अन्यथा या सर्व कापूस खरेदी केंद्रावरील खाजगी खरेदी शेतकरी बंद पाडण्याच्या भूमिकेत आहे व प्रशासनाच्या स्तरावर याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची श्यक्याता आहे दिनांक २०/०५/२०२० रोजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे धरणे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती माजी आमदार निमकर यांनी शेतकर्यांचा वतीने भाजपच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला केली आहे.
याबाबत या आधीसुधा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री ,श्री.मा.हंसराज जी अहिर , माजी अर्थमंत्री आमदार श्री.मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा झालेला आहे.तसेच १२/५/२०२० रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुख्यमंत्री श्री.मा.उध्दव जी ठाकरे ,मा.केंद्रीय व वस्त्रोद्योग मंत्री मा.स्मृती जी ईराणी ,जिल्हाधिकारी चंद्रपूर सीसीआय व संबंधित अधिकाऱ्यांना विस्तृत निवेदन दिलेले आहे.तसेच जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांचा कापूस सीसीआय कडे खरेदी करण्याचे आदेश दिनांक १३/५/१/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिनिंग व्यावसायिकांना आदेश दिलेले आहे व या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे शेतकर्यांनी अभिनंदन केले आहे.जर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जीन व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवल्यास आता शेतक्रयंसोबत रस्त्यावर उतरून खाजगी खरेदी सुद्धा बंद पाडण्यात येईल अशे निवेदन आज रोजी १४/५/२०२० तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत ने जिल्हाधिकारी चंद्रपूर व सबंधित यंत्रणा व सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.याप्रसंगी माजी आमदार श्री मा.सुदर्शन निमकर,सुनील उरकुडे सभापती कृषी व पशुसंवर्धन जी.प.चंद्रपूर तथा तालुका अध्यक्ष भाजपा ,अरुण मस्की ,वाघुजी गेडाम,अॅड प्रशांत घरोटे ,हरिभाऊ झाडे,काशिनाथ पा.गोरे,विनायक देशमुख,संजय उपगल्लवर,महादेव तपासे,सचिन शेंडे,दिलीप गिरसावळे,भाऊराव चांदणखेडे,सुरेश रागीट,सचिन दोहे,श्रीनिवास पांजा,देवराव पा.सातपुते,आदित्य भाके सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here