मजुरांच्या हाल अपेष्टेला जबाबदार कोण? आत्मनिर्भरता म्हणजे आत्महत्या काय? – नम्रता ठेमस्कर

0
187
Advertisements

चंद्रपूर – एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात फ्लॅश बॅक सांगताना एखाद्या कलाकाराचा आवाज घेतात तसच काहीसं पंतप्रधान मोदी यांच १२ मे रोजीच भाषण होत. भारताने काय केलं?? भारताची परंपरा कशी?? भारत कसा सोने का चिडीया होता?? भारताच्या प्रगतीत जगाची कशी प्रगती आहे?? भारत हे करू शकतो भारत ते करू शकतो, भारतात युवकांमध्ये टॅलेंट आहे, त्यामुळे भारत प्रगती करेल.भारतातील औषध जगाला कमी पडत आहे त्यामुळे , भारताला मानवजातीची पर्वा आहे .संपूर्ण जगाचा विचार भारत करतो?? अगदी बरोबर सर्व जगाचा विचार भारत करतो पण आपल्याच देशातील मजुरांचा करत नाही ही सत्यस्थिती असतांना आपल्या या भाषणातून या बद्दल चकार शब्द त्यांनी काढला नाही. मंजुरांनी भोगलेल्या हालअपेष्टा हे एक तप आहे असं त्यांना वाटत पण हे तप तुमच्यामुळे त्यांना करावं लागतं आहे ते स्वतःच्या मर्जीने करत नाही आहे याचा विचार सरकार करत नाही, आणि भर उन्हाळ्यात लेकरा पोरांसोबत मजबुरीने चालणाऱ्या मजुरांना मोदी तप करत आहे असं म्हणतात पण रेल्वे रुळावर कटुन मेलेल्या मजुरांसाठी साधी संवेदना व्यक्त करत नाही ,पण त्यांना आता सर्व जगाची पर्वा वाटून राहिली आहे. आपल्याच देशातील लोक अमानुषपणे १००० किलोमीटर पायी चालत जात आहे त्याच आपल्याला काही वाटत नाही पण जगात भारत २१ व्या शतकातील एक प्रगत देश बनणार हे मात्र छातीठोकपणे सांगून देशभक्तीचे फेक उमाळे आपल्या भाषणातून जागवता येतात, हे आताच्या परिस्थतीत जबाबदारी घेण्यापेक्षा सोप्प नक्किच आहे.आपदा को अवसर मे बदलाना है ते कसं तर २०२० मध्ये २ लाख करोड च पॅकेज!या पॅकेज च नाव आहे आत्मनिर्भर भारत. म्हणजे नेमकं काय?? सगळंच भारतात बनवल्या जाईल का?? या २० लाखातील किती पैसे जवळजवळ १०० कोटी लोकसंख्येच्या माणसांना मिळणार आहे का हाच एका गरीब माणसाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठे काय देता किती उद्योगाला काय देता याचा दोन वेळच्या जेवणासाठी भटकणाऱ्या माणसाला काही देणं घेणं नाही.मुळात मोदी यांनी आपल्या भाषणात जे पॅकेज घोषित केल ते वीस लाख कोटींचे नाहीच करण त्यामधील जवळ जवळ दहा कोटी रुपये आहेत ते आधीच घोषित झाले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष घोषणा झाली केवळ १० लाख कोटींचीच. कारण ८लाख ४० हजार व्यवस्थेत पैसे टाकण्याची घोषणा आर.बी.आय. ने आधीच केली आहे आणि या आधीच गरीबांसाठी १लाख ७० हजार करोडच पॅकेज घोषित करण्यात आलेल आहे ते सर्व मिळून २० लाख होत आहे हे स्वतः मोदींनीच सांगितलं पण केवळ एकदा हलकेपणे सांगून बाकी पूर्ण वेळ जनकल्याण इत्यादी गोष्टी होऊन पाऊण तासाच प्रयोग एकदाच संपला आणि बाकी जबाबदारी त्यांनी अर्थमंत्री निर्माला बाईकडे सोपवली. निर्मला बाईंनी २० लाख करोडच सूत्र सांगितलं पण आमच्या सारख्या सामान्य माणसाला एवढं च कळत १०० करोड लोकांना जरी सरळ सरळ १५ हजाराचे चेक दिले तरी तो माणूस खरेदी करू शकतो, उद्योगपतीचा माल विकल्या जाऊ शकतो पैसेच नाही तर उद्योगांची उत्पादन खरेदी करणार तरी कोण??बाई सांगतात MSME ला ३ लाख करोड रुपये देणार हे कर्ज व ऑक्टोम्बर पासून मिळणार आणि यासाठी १ वर्ष व्याज देखील भरावे लागणार नाही , पण याचे युनिट ४.५ लाख आहेत आणि ३ लाख पर्यंतचा हिशोब केला तर प्रत्येक युनिटला ६लाख६६ हजार एवढीच रक्कम मिळू शकते त्यात होणार तरी काय?? यामुळे हे युनिट जागृत कसे होणार?? आणि उतपादन कितीही करा खरेदीसाठी लागणार पैसा आणणार कुठून?? युवकांच्या नौकऱ्या जात आहेत त्यांचा वयोगट २० ते २५ वर्ष आहे. ऐन उमेदीत बेरोजगारी मिळत असेल तर या तरुणाने आपलं टॅलेंट घेऊन या देशात राहायचं तरी कसं?? याच टॅलेंट चा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला आहे. सरकारी आकडेवारी नुसार आत्ता रोजचे २८ रुपये खेड्यात कमवणारा माणूस दारिद्र्य रेषेखाली म्हणजे BPL मधे आहे तर शहरात ४३ रुपये कमवणारा माणूस BPL मध्ये आहे. आणि देशातील जवळ जवळ १०० करोड लोक गरीब किंवा BPL मध्ये आहेत. अस असतांना या वर्गासाठी जो वर्ग सर्वात अधिक लॉक डाऊन मध्ये होरपळल्या जात आहे त्यांना सरकार सरळ सरळ का मदत करत नाही?? हा महत्वाचा प्रश्न आहे. भारतातील दर ५ वी व्यक्ती गरीब आहे काही राज्यात २री ३री व्यक्ती गरीब आहे. गरीबांची संख्या इतकी आहे की त्यांच्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे याचा उलगडा कोणीही करत नाही आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी यातला किती पैसा उपयोग करणार ते देखील माहीत नाही. अमेरिकेला औषध पुरवल्याने आपली तुलना अमेरिकेशी होत नाही कारण अमेरिकेत ९ लाख करोड रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. या पॅकेज मधून तसं काहीही होणार नाही आहे. उत्पादन बंद असल्याने नौकऱ्या जात आहेत काहींना अर्धा पगार मिळत आहे काहींना तर पगरच नाही मग आत्मनिर्भर होणार तरी कसे?हे समजायला मार्ग नाही, स्वदेशी वस्तूंची किंमत आणि चिनी वस्तूंची किंमत यात इतका फरक आहे की, माणसाकडे आधीच पैसा नाही तर तो महाग वस्तू घेणार तरी कशी?? हा प्रश्न अनुत्तरित आहे. याधी देखील मोदींनी मेक इंडिया ही घोषणा केली होती त्याच काहीही झालेलं नाही त्याचच नाव आत्मनिर्भर भारत करून मोदींना आपली फ्लॉप झालेली च योजना पुन्हा आणायची आहे हे स्पष्ट आहे. देशात जवळ जवळ २३ करोड रेशनकार्ड धारक आहेत बाकीच्यांकडे नाही, त्या सर्वांना पुढील किमान सहा महिने रेशन मोफत देण्याची गरज आहे. देशातील माणूस कुठेही वास्तव्यास असू दे त्याला रेशन दुकानात रेशन मिळालं पाहिजे ही पहिली गरज आहे. मेक इन इंडिया तील सिंह आता डरकाळ्या फोडण बंद झाले म्हणून स्वतःची जबादारी सरकार लोकांवर टाकत आहे का?? देशातील चार स्तंभांच मागच्या सहा वर्षात काय झालं हे सर्वांना माहीत आहे?? पहिल्या स्तंभांपासून चौथ्या पर्यंत स्वतःची अधिकारशाही सुरू आहे त्यात पाचवा स्तंभ आत्मनिर्भरता देशातील नागरिकांच्या माथी मारून स्वतःची जबादारी सरकार झटकण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. यात भर म्हणजे या भाषणात देखील “त्यांनी खुलमे जब भारतीय शौच नही करते तो वो भी दुनिया मे मिसाल बनती हैं ” त्या योजनेची पण काय हालत झाली आहे आपल्याला माहितीच आहे. आपल्याला एकच समजते १०० करोड लोकांना किती पैसा सरळ सरळ मिळेल जेणेकरून तो या लॉक डाऊन मधून सावरू शकेल या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणीच देऊ शकत नाही आणि रस्त्यावरून चालणाऱ्या मजुरांना वेदनांना त्याग तप म्हणून त्यांच्या तोंडाला पाने पुसायची?? अशी आत्मनिर्भरता काय कामाची मोदीजी??
गरीबांची आत्मनिर्भरता की आत्महत्या तेवढं फक्त सांगून द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here