गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील ग्रामस्थांनी “लोकवर्गणी” द्वारे 200 गरीब,गरजू कुटुंबांना धान्य व किराणा अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबांपर्यंत शासनाकडून अजूनही मदत पोहचली नसून शासकीय मदतीची वाट न पाहता बिबी गावकऱ्यांनी गरीब कुटुंबांच्या मदतीसाठी 1लाख रुपयांची लोकवर्गणी व दहा क्विंटल धान्य गोळा केले.त्या वर्गणीतून 200 कुटुंबांना 5 किलो गहू,5 किलो तांदूळ,1किलो तेल,1किलो तूरडाळ,मीठ,तिखट,हळद इत्यादी साहित्य दिले.वेगवेगळ्या उपक्रमात प्रमुख्याने सहभागी होणाऱ्या बिबी ग्रामस्थांनी कोरोनातही लोकसहभाग दर्शवून मदत गोळा केली आहे.ग्रा.पं.चे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून आवाहन केले.त्यानंतर लोकांनी प्रतिसाद देत दोन- तीन दिवसात १ लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा केली हे मात्र विशेष.
————-///———–
*”आमचा गाव औद्योगिक परिसर असल्याने बाहेरील अनेक लोक कामानिमित्त येथे वास्तव्यास आहे. मूळगावी त्यांचे रेशनकार्ड असल्याने याठिकाणी त्यांना धान्य मिळत नाही. अशा गरजू कुटुंबांची आम्ही यादी बनवून त्यांच्यापर्यंत धान्य पोहचवले आहे.गाववासीयांच्या सहभागातून हे शक्य झाल्याचे मत उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी News34 ला दिली आहे.”*
लोकवर्गणीतून 200 गरजूंना अन्न धान्याची मदत, जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रा.पं.चा पुढाकार
Advertisements