चंद्रपुरातील दुसरा कोरोना रुग्णाचे निवास असलेला संपूर्ण परिसर सील

0
105
Advertisements

चंद्रपूर – : चंद्रपूर शहरात आज कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. 23 वर्षीय एक महिला पोजीटिव्ह आढळली. बिनबा गेट परिसरातील ही महिला 9 तारखेला यवतमाळ इथून आपल्या आई आणि भावासोबत आली. या तिघांनाही होम क्वारंटीन करण्यात आलं होतं. या महिलेचा swab रिपोर्ट आज पोजीटिव्ह आल्यानंतर तिच्या घराचा संपूर्ण परिसर प्रतिबंधीत करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून परिसर सील करण्याच्या सूचना दिल्या. पहिला रुग्ण 2 मे रोजी सापडला होता. आता दुसरा रुग्ण सापडल्यानं प्रशासनात खळबळ उडाली असून, शिथिल केलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली. त्यामुळं मागील सोमवारपासून सुरू झालेली बाजारपेठ उद्यापासून पुन्हा बंद केली जाणार असून, अत्यावश्यक सेवेची दुकानं तेवढी सुरू राहतील. सकाळी सात ते दोन या वेळात ही दुकानं सुरू राहतील. नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडण्यास मनाई असून, नागरिकांनी घरी राहून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here