विना रेशनकार्ड धारक गरजूंना धान्य पुरवठा करा, भाजपचे नगरसेवक डोहे यांची मागणी, जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
67
Advertisements

गडचांदूर,सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” मुळे सरकारने सगळीकडेच लॉकडाउन जाहीर करून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले.याला प्रतिसाद देत नागरिकांनी सुद्धा घरटे सोडले नाही.परिणामी गोरगरीब रोजमजूरी करणारे,फुटपाथवरील लहानसहान दुकांनदारांचे रोजगार बुडाला आणि परिवारावर उपासमारीची वेळ आली.याकाळात कार्ड धारकांना शासनाने नियमित बरोबरच मोफतचे धान्य सुद्धा दीले.परंतु रेशनकार्ड नसलेल्यांना कुठलीच सहायता मिळाली नसल्याची बोंब सुरू आहे.अशांना आपापल्या कुटुंबाची उपजीविका भागविणे कठिण झाले.सदर लोकांना धान्य देण्याबाबत सतत मागणी सूरू असताना स्थानिक तलाठीच्या माध्यमातून यादी तयार करून अन्नधान्य पुरवठा विभाग तसेच तहसीलदार कोरपना यांच्याकडे मंजूरीही मिळाली मात्र अजून पर्यंत त्यांना रेशन मिळाले नसून उपासमारीचे दिवस काढण्याची नामुष्की ओढवली आहे.शासनाप्रशासनाने याकडे लक्ष देऊन विना रेशनकार्ड धारक गरजूंना त्वरित धान्य पुरवठा करावा अशी मागणी गडचांदूर न.प.येथील भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here