कोरोना सैनिकांचा जागतिक परिचारिकादिनी यथोचित गौरव

0
199
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाचे संकट जगावर घोगावत असताना त्याचे सावट भारतावर ही गंभीरतेने जाणवते आहे.हा आजार भारतातही चांगलेच हातपाय पसरत असल्यामुळे ह्याविरुद्ध शासन प्रशासन यंत्रणा सर्वतोपरी निर्वानीची लढाई लढत आहे. या महामारीविरुद्ध लढणाऱ्या निवडक कोरोना योद्धा यांचा यथोचित गौरव अलीकडेच विकलांग सेवा संस्था पुढाकाराने व शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिवसाचे औचित्य साधून करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या संगीता येरगुडे ,कोविड 19 ऑनलाइन ज्ञान स्पर्धेत 15 महाविद्यालयाचे प्रमाणपत्र प्राप्त युवा कलावन्त निशा धोंगडे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरची परिचारिका भाग्यश्री निरंजने, स्टाफ नर्से पूजा सराटे या चौघींना शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व आरोग्य मार्गदर्शक ग्रंथ देऊन त्यांच्या कोरोना वारीअर्स म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वर्षा कोठेकर ,सीमा ठाकूर ,पूजा शेरकी, संगीता चव्हाण, प्रसाद पान्हेरकर ,देवराव कोंडेकर,प्रा.रुकैया शेख,संगीता ठोसरे श्रीमती पाटील यांची उपस्थिती लाभली होती .
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता शोभा खोडके,प्रा प्राजक्ता वासेकर,राहुल पेंढारकर ,पूजा राखोंडे यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here