Advertisements
चंद्रपूर : शहरात आज कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. शहरात यवतमाळ येथून आलेली युवती चाचणीत कोरोनाग्रस्त निघाली असून, शहरातील बिनबा गेट परिसरात तातडीनं प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करण्यात आले. आपल्या आईच्या उपचारासाठी ही युवती यवतमाळ इथं गेली होती. 9 मे रोजी ती कारने आई-भावासह चंद्रपुरात परत आली होती. 11 मे रोजी या युवतीचे swab घेण्यात आले. त्यात ती पोजीटिव्ह असल्याचा रिपोर्ट आज प्राप्त झाला. तिच्या आई आणि भावाच्या swab चे अहवाल सध्या प्रलंबित असून, जिल्ह्यात दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर जिल्हाधिका-यांनी तातडीची बैठक बोलावली. पहिला रुग्ण 2 मे रोजी सापडला होता.