गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील मौजा हिरापूर गाव येथे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा 30 कुटुंबांना मोफत धान्य किट व अंदाजे 550 मास्कचे वाटप करण्यात आले.संपुर्ण जगात थैमान घालत असलेल्या या विषाणूने आजघडीला अनेक गोरगरिबांचे जगणे मुश्कील केले आहे.अशांना आपल्या पदाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने मोफत धान्य कीट व मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचा मत सरपंच कोडापे यांनी News34 पुढे व्यक्त केला आहे.कीट मध्ये 5 कि.गहू,5 कि.तांदूळ,1कि.तेल,1कि. साखर,पत्ती,तिखट, मीठ, हळद,2 साबण खोबरे तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली असून सरपंच कोडापेंसह ग्रा.पं.सदस्य रविंद्र आत्राम,तं.मु.अध्यक्ष दुर्योधन सिडाम,वाघमारे गुरुजी,मारोती ठाकरे,नानाजी लोंढे,गँगाधर मडावी,अरूण काळे,दत्ता डाहूले,भास्कर विधाते इत्यादींची यावेळी उपस्थिती होती.
हिरापूर येथे रेशनकार्ड नसलेल्यांना मोफत धान्य कीट व मास्क वाटप, सरपंच प्रमोद कोडापेंचा पुढाकार
Advertisements