लाॅकडाऊन काळात जनतेनी केलेल्या सहयोगामुळे मनपा क्षेत्रात कोरोनाचा फैलाव नाही – पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

0
180
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालीकेच्या कार्यक्षेत्रात लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून भाजपा नगरसेवकांच्या माध्यमातून गरीब आणि वंचीतांना सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा गरजूंना जीवनोपयोगी साहित्य वाटण्याचा चांगला निर्णय घेतला परंतु अंमलबजावणी सर्वेक्षण आधारीत नसल्यामुळे 20 हजार लाभाथ्र्यांना याचा फायदा व्हायला हवा परंतु प्रत्याक्षात केवळ 8000 लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या विशेष निधीतून याचा फायदा होत असल्याचे वास्तव केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रवूर महानगरपालिकेच्या भाजपा नगारसेवकांच्या बैठकीत केलेल्या चर्चेत समोर आले. आहे. याबाबत नगरसेवकांच्या सुचनेनुसार राशन कार्ड नसणार्यांचे पुनश्च सर्वेक्षण करणे व नांवे नोंद करण्याची मागणी अहीर यांनी केली. सदर बैठक महापौर राखीताई कंचर्लावार, गटनेता वसंता देशमुख, विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेश मून, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, संदिप आवारी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पाडली.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात लाॅकडाऊन पश्चात गरजूंना योग्य सहायता उपलब्ध करुन देण्यासाठी भाजप नगरसेवक कार्यरत आहेत. ज्यांना याबाबत आलेल्या अनुभवांचे कथन आणि गरजूंना अधिक चांगल्याप्रकारे सहायता कशाप्रकारे उपलब्ध करुन देता येईल यासाठी अहीर यांच्या कार्यालयात सामाजिक अंतर पाळून नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील कोरोना विरुद्ध संघर्षात सहाभागी प्रभागातील डाॅक्टर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि सफाई व्यवस्थेबद्दल आढावा घेण्यात आला. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेतर्फं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार वेळीच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या याशिवाय शहरातील परप्रांतीय मजूर आणि गरीबांना घरपोच भोजन पाकिटाचे वाटप करण्याचा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल बैठकित महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाÚयाचंे अभिनंदन करण्यात आले. महानगरपालिकेच्या नेतृत्वात शहरात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना संक्रमणाचा फैलाव रोकण्यात आपल्याला यश लाभल्याचेही अहीर यांनी बैठकिचा आढावा घेतांना नमुद केले व महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्व अधिकारी, कर्मचारी, आराग्य सेविका, आशा वर्कर्स, सफाई कामगार, यांचे अहीर यांनी आभार मानले व अभिनंदन केले.
सोबतच चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नागरीकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाचा फैलाव रोकण्यास सहकार्य केल्याबद्दल तसेच व्यापारी वर्गानी या कठिण काळात अत्यावश्यक सेवा वाजवी भावात दिल्या त्यांचेही हंसराज अहीर यांनी जनेतेचे आभार मानले व अभिनंदन केले.
जिल्ह्यात आणि महानगरात कोरोना चा फैलाव थांबविण्यात यश प्राप्त झाले असले तरी लाॅकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय आणि नौकऱ्यांवर संकट ओढवले असल्याने या गरीब व वंचीत घटकांना यापुढेही मदत करण्याची गरज असल्याची सुचना करीत अहीर यांनी सर्व भाजप नगरसेवकांना यापुढेही शासन व महानगरीपालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून वंचीत व गरीबांना यापुढेही मदत करण्यास सिद्ध राहीले पाहिजे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here