लाकडाऊन मध्ये शेतकऱ्यांचे शोषण, बेभावाने कापूस खरेदी, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा आंदोलनाचा इशारा

0
232
Advertisements

राजुरा – राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजरा व कोरपना या तालुक्यामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते . कोरोणा महामारीच्या संकटात लाकडाऊन मुळे शेतकऱ्यांचा 40 ते 50 टक्के कापूस घरातच साठवून आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक जुळवाजुळव करून शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीत आहे. मात्र खाजगी व्यापाऱ्याकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे. संकट काळात शेतकर्‍यांचे शोषण करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेली आहे .अन्यथा 18 मे ला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे.

सीसीआयच्या च्या माध्यमातून राजुरा तालुक्यांमध्ये एक केंद्र कोरपना तालुक्यामध्ये तीन केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे . दोन्ही तालुक्यामधील सि . सि . आय . खरेदी केंद्रावर एकाच ग्रेडर च्या माध्यमातून कापसाची ग्रेडीग केल्या जात होती . दि . ८ / ५ / २०२० पासून दुसन्या ग्रेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे . राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती कडे ८ हजार तर कोरपणा बाजार समितीकडे ७५०० च्या वर कापूस गाड्यांची शेतकन्यांनी नोंदणी केलेली आहे .
राजुरा व कोरपना तालुक्यात एकूण 14 जिनिंग आहेत .यापैकी सीसीआय मार्फत कोरपना तालुक्यात तीन जिनिंगवर व राजुरा तालुक्यात फक्त एकाच जिनिंग वर खरेदी सुरू आहे. या दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच जिनिंगवर सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
सि . सि . आय . चे राजुरा तालुक्यात असलेले किसान जिनिंग हे एकमेव केंद्र सुद्धा बंद आहे . कोरपना तालुक्यात एकाच ग्रेडर च्या माध्यमातून तीन खरेदी केंद्रावर एका आठवड्यातून दोन – दोन दिवस खरेदी सुरू आहे . कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे शासनाच्या निर्देशानसार प्रतिदिवस खरेदी केंद्रावर फक्त २० गाड्या खरेदी करण्याचे निर्देश आहे . दररोज 20 कापसाच्या गाड्यांची खरेदी झाल्यास दोन्ही तालुक्यातील जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांचे कापूस खरेदी करण्यासाठी शासनाला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. सीसीआय वर खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे .शेतकरी बी-बियाणे खत घेण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे .पीक कर्जासाठी बँकांच्या येरझारा मारत आहे. अशातच शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाला मातीमोल भावाने खाजगी व्यापारी लुटत आहेत .यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये सर्व जिनिंगवर शासनाने सीसीआय मार्फत कापूस खरेदी करणे अपेक्षित आहे .मात्र केवळ मोजक्‍याच जिनिंग वर कापूस खरेदी सुरू असल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक शोषण सुरू आहे. यावर शासनाचे नियंत्रण नाही. सीसीआयच्या च्या मुंबई चिफ मैनेजीग डायरेक्टर श्रीमती पि . राणी यांनी सप्टेंबर पर्यत शेतकन्यांचा कापूस खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे . परंतु अवघ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे . या भागामध्ये शतकन्यांचा कापूस साठविण्याकरीता वेअर हाऊस ची सुविधा नाही . बाजारात कापसाला हमीभाव नाही घरी ठेवायला जागा नाही या विवंचनेत शेतकरी आहे.
शिवाय पावसामुळे कापूस काळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे निर्देश असतानाही सीसीआय मार्फत खरेदी करण्यास खासगी जिनिंग मालक टाळाटाळ करीत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील इतर जीनिंग व्यवसायीकानी सीसीआय द्वारे कापूस खरेदी करण्याचे व करारनामा करण्याबाबत पत्र दिलेले आहे .मात्र जिनिंग व्यवसायिक कृत्रिम कारणे दाखवून सीसीआय मार्फत खरेदी घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. मात्र याच जिनिंगवर शेतकऱ्यांचा कापूस मातीमोल भावाने खरेदी केला जात आहे. अशा व्यापाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी व त्यांचे परवाने रद्द करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदनाद्वारे शासनाला दिलेला आहे.

Advertisements

सुदर्शन निमकर
माजी आमदार, राजुरा.

या भागातील शेतक – यांच्या वतीन विनती करण्यात येते की,
सीसीआय कापूस खरेदी केंद्र वाढविण्यात यावे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचे कापूस खरेदी कमी वेळात होईल त्यांना खरीप हंगामासाठी आर्थिक मदत मिळेल. खाजगी व्यापार करून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट थांंबणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here