चंद्रपुरातील टाळेबंदी शिथिलपणाचा नागरिकांनी घेतला फायदा, शहरात सोशल डिस्टनिंगचा उडाला फज्जा

0
63
Advertisements

चंद्रपूर – 11 मे पासून चंद्रपुरातील टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असताना मात्र नागरिकांनी रस्त्यावर अभूतपूर्व गर्दी केली.

देशात कोरोना विषाणू झपाट्याने वाढत असताना मात्र चंद्रपूर शहरातील बाजारपेठ नियम अटींना समोर करून सूरु करण्यात आली मात्र नागरिकांनी याचा फायदा घेत सर्व नियम मोडीत शहरातील रस्त्यावर एकच गर्दी केली.

मागील महिन्यात जिल्हाधिकारी खेमणार यांनी याप्रकारे टाळेबंदी शिथिल केली होती त्यावेळेस सुद्धा नागरिकांनी गर्दी केल्याने जिल्हाधिकारी यांनी निर्णय मागे घेत टाळेबंदी कायम ठेवली.

तीच परिस्थिती पुन्हा ओढावली असल्याने जिल्हाधिकारी पुन्हा टाळेबंदी मागे घेणार का अशी शक्यता नाकारता येत नाही, जगात कोरोना विषाणू झपाट्याने वाढत आहे, परंतु चंद्रपूर शहरातील नागरिकांना या विषाणूबद्दल गांभीर्य नाही.

ज्याप्रमाणे नागरिकांनी आज गर्दी केली आहे जणू नागरिकच कोरोना विषाणूला आमंत्रण देत आहे की काय असे वास्तविक चित्रचं समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here