चंद्रपूर – नर्सेस फोर्स ऑफ चेंज म्हणजे परिचारिका बदल घडवू शकतात, जागतिक पातळीवर आरोग्य, आरोग्याचा गरजा, नेहमीच सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय असतो.
सध्या जगात बदललेलं वातावरण, वाढलेली लोकसंख्या, असाध्य रोगात झालेली वाढ, नवीन रोगांची लागण आणि आता या रोगात कोरोना विषाणूचा शिरकावाने जगाला हादरवून टाकले आहे.
यासारखे विषाणू देशाच्या सीमा पार करू लागले आहे, याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्था व वैयक्तिक जीवनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
आधुनिक परिचर्येचा पाया घालणारी ब्रिटिशप्रणेती फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिन, 1974 पासून हा दिन जगात साजरा करण्यात येतो, आज कोरोनाच्या या लढ्यात परिचारिका म्हणजे एक मजबूत कणा म्हणून समोर येत आहे.
सध्या या महामारीत परिचारिका कोरोना वरीयर्स म्हणून सामोरे आले आहे.
चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णालयात आज परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर्स यांनी मिळून प्रसूती वार्ड येथील परिचारिका यांना सरप्राईज देत केक कापून जागतिक परिचारिका दिन साजरा केला.
डॉक्टरांतर्फे अचानक मिळालेल्या या भेटीत परिचारिका यांना चांगलाच आनंद झाला.