गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगात “कोरोना” विषाणूने थैमान घातले असून देशवासी अक्षरशः हैराण झाले आहे.याच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले.यामुळे हातवर आणुन पानावर खाणारे,मोलमजुरी करणाऱ्यांपुढे पोट भरण्याची समस्त निर्माण झाली.हाताला काम नसल्याने जवळ पैसा नाही यामुळे कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची पाळी आली.शासन विविध प्रकारे सहयोग करीत असताना शहरातील सामाजिक संघटना,राजकीय कार्यकर्त्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे.अशातच गडचांदूर येथील भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या सौ.रंजना डॉ.सुधाकर मडावी यांचा 11 मे रोजी वाढदिवस होता.मात्र याप्रसंगी कोणताही खर्च न करता यांनी गोरगरीब गरजवंतांना जीवनावश्यक असलेल्या धान्य कीटचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.यावेळी गडचांदूर न.प.चे नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे सह भाजपच्या इतर नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजप महिला नेत्याच्या वाढदिवसा निमित्य गरजूंना धान्य कीटचे वाटप
Advertisements