बॅक कर्जमाफी यादीचा घोळ, कर्ज वाटपात विलंब, शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात, जबाबदार कोण?

0
176
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2 लाख करण्याची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला आहे.या घोषणेनूसार राष्ट्रीयकृत बँकेने थकीत गाव निहाय 2 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून नव्याने पुढील हंगामासाठी कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली.मात्र काही लोकांची नावे कर्जमाफी यादीत आली नाही.सेवा सहकारी संस्था व आदिवासी विवीध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो.थकबाकीदार,कर्जदार सभासद कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे.छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना व नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची घोषणा करण्यात आली.शासनाने टप्प्या टप्प्ययाने मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल असे जाहिर केले.संस्था निहाय 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली.अनेकांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट नसल्याने निराशा झाली.सण,सोळा,सतरा हंगामातील अतिवृष्टी सतरा अठरा दुष्काळग्रस्त व 50 टक्के आणेवारीच्या आत आसलेल्या गावातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे कळते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन कर्जमाफी तक्रार मान्य,अमान्य नोंदी दाखल करता आल्या नाही.त्यामुळे अनेक शेतकरी आपली कर्जमाफीची कैफियत ऑनलाइन दाखल करू शकले नाही व त्यानंतर ही साईट बंद असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून अपात्र ठरले.प्रशासनाने थकित कर्ज वसुली करू नये असे निर्देश नुकताच दिले मात्र कर्जमाफीत पात्र असताना नवीन कर्जापासून शेतकरी वंचित राहणार आहे.तसेच पुढील हंगामाची लगबग सुरू झाल्याने शेतकरी अनेक अडचणीत असताना नवीन कर्ज घेण्यात घोडे अडले याचे काय ? शेतकरी अडचणीत असून कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाइन माहिती प्राप्त करून 2 लाखांपर्यंतचे कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा,शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मूळ कर्जाच्या 30 टक्के किंवा 50 टक्के कर्ज माफ झाल्याने उर्वरित रक्कम भरण्याचा सल्ला सहकारी संस्था देत आहे.2 लाखांच्या आत मूळ रक्कम असताना संपूर्ण लाभ का नाही यामुळे तळ्यात मळ्यात अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जमाफी पासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना नवीन हंगामात कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.यादीचा घोड संपुष्टात आणून कर्जमाफीचे निकष व धोरण ठरले असताना अत्यल्प कर्जमाफ नोंदी घेण्यामागील चूक कोणाची,2 लाखांपर्यंत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे कारण काय,सभासदांच्या कर्ज थकबाकी संबंधी संपूर्ण नोंदी असताना सरसकट कर्जमाफीत समाविष्ट न झाल्याने वंचित शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घ्यावा.पुढील हंगामात शेतकरी कर्ज घेण्यापासून वंचित राहणार नाही याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापक यांनी शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही व त्यांना पुढील हंगामाला कर्ज उपलब्ध होईल यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली,विनोद नवले,संजय सिडाम,किशोर सातपूते इतरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here