चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे ते तस्कर कोण?, तस्करांना कोण घालतंय पाठीशी?

0
192
Advertisements

चंद्रपूर – राज्यात 2012 पासून तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी करण्यात आली होती, कॅन्सरचे वाढते प्रमाण व युवक या पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्यानें हा निर्णय घेण्यात आला होता.
8 वर्षांनी सुद्धा या तंबाखू जन्य वस्तू सर्रासपणे विकल्या जात आहे, या प्रतिबंधक पदार्थावर कारवाई फक्त पानटपरी वाल्यांवर होत आहे, मोठे मासे अजूनही या तस्करीत लिप्त आहे.
2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती, 5 वर्षांनी पण दारूबंदी आधी सारखी परिस्थिती जिल्ह्यात आहे, अवैध दारूवर नियंत्रण करणे प्रशासनाला जमलंच नाही.
कोरोना विषाणूच्या सावटाखाली सुद्धा जिल्ह्यात तंबाखू जन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहे, कारवाई लहान व्यवसायिकांवर मग मोठ्या तस्करांच काय?
जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे मासे बोटे मोजण्याइतके आहे, त्यांचे गोदाम सुद्धा शहरी भागात आहे, पण पोलिसांच्या नजरेतून ते आजही सुटलेच आहे.
यामागचं कारण मात्र अजूनही समजेनासे आहे, काही राजकीय मंडळी यावर आवाज उचलतात मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते सेटिंग करून परत येत असतात.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या पदार्थाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरूच आहे, प्रशासन कोरोना विषाणूशी लढत असताना हे व्यापारी मात्र जिल्ह्यात तंबाखूचा खुलेआम व्यापार करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.
चंद्रपूर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुगंधित तंबाखूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे या मोहिमेत नागरिकांनी त्यांची साथ द्यावी असे आवाहन त्या युवकांनी केलं आहे.

आज या सुगंधिक तंबाखूचा व्यापार महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा झाला आहे, या तस्करांचा वेळीच मुसक्या आवळायला हव्या अन्यथा कॅन्सरचा कहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढेल.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here