ईको प्रो तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच गरजू व्यक्तींना धान्य किटचे वाटप

0
201
Advertisements

चंद्रपूर – कोरोना आपदा दरम्यान संपूर्ण देश लॉकडाउन झालेला आहे, सर्व नागरिक आपआपल्या घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशाही परिस्थितीत डॉक्टर पोलिस सफाई कर्मचारी दिवस-रात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहे, त्यासोबतच महानगरपालिकेचे घंटागाडी सफाई कर्मचारी रोज आपल्या परिसरात येऊन आपल्या वाड्यातील कचरा संकलन करतात. कोरोनाच्या सावटात सुद्धा नियमित स्वच्छता कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, म्हणून इको-प्रो संस्थेच्या वतीने आव्हान करण्यात आले होते, की आपल्या परिसरात सफाई कर्मचारी घंटागाडी वाले ताई-दादा यांचा सत्कार करून त्यांना आवश्यक मदत करण्यात यावी. या आव्हानाला साथ देत मातानगर, महाकाली वॉर्ड विभाग तसेच स्थानिक नागरिक यांनी परिसरातील 26 सफाई कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार केला, सोबतच या सर्वांना भेट म्हणून धान्य किट देण्यात आली.

इको-प्रो मातानागर शाखा व स्थानिक नागरिकांनी मिळून आटो स्टँड चौक मधील 16 ऑटो चालकांना सुद्धा आवश्यक किराणा धान्य किटचे वाटप करण्यात आले. यासोबत परिसरातील 200 पेक्षा अधिक गरीब गरजू परिवारास धान्य किट वाटप करण्यात आले. सदर उपक्रम इको-प्रो महाकाली विभाग प्रमुख तथा नटराज सांस्कृतिक कला केंद्र चे अध्यक्ष अब्दुल जावेद आणि स्थानिक नागरिकाकडून सदर सामाजिक उपक्रम या परिसरात राबविला जात आहे.

Advertisements

संस्थेचे स्थानिक कार्यकर्ते, शुभचिंतक, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात विमल शहा, अल्का गुरुवाले, दिलीप गुरुवाले, अलका रोहनकर शंकर बल्लेमवर, पंधरप्पा हंस, प्रशांत बेले, नरेंद्र बंसोड़, संदीप गोवर्धन, अरुण तुंगिलवार , अनिल कांबळे, उत्तम पाटील, अमोल गोडघाटे, किशोर भालेकर,लक्ष्मण गेडाम,जितेंद्र मेश्राम, सचिन कांबले, चंदू देवांगण,वीरू देवांगन आधी सहकार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here