कोरोनाची दहशत, 48 दिवसांच्या वनवासानंतर चंद्रपुरातील बाजारपेठ सुरू

0
174
Advertisements

चंद्रपूर : चंद्रपुरात आज तब्बल 48 दिवसांनी बाजारपेठ उघडली गेली. जिल्ह्यात सध्या एकच कोरोनाबधित रुग्ण असून, परिस्थिती नियंत्रणात असल्यानं जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठानं आणि उद्योग सुरू करण्याला प्रशासनानं अटी घालून मान्यता दिली. टाळेबंदीच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच दुकानं सुरू करण्याचा मान्यता देण्यात आली. त्यामुळं आज सकाळी दहा वाजल्यापासून बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सात ते दोन आणि इतर दुकानं दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. बाजारपेठ सुरू झाल्यानं व्यापारीही खुश आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना संकटामुळं सगळे व्यवसाय ठप्प झाले होते. ते आज पुन्हा सुरू झाले. जिल्ह्यात कोरोनाचा सध्या एकच रुग्ण असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. तर त्याच्या संपर्कात आलेले सर्व लोक हे चाचणीत निगेटिव्ह आलेत. ही परिस्थिती समाधानकारक असल्यानं जिल्हा प्रशासनानं धाडसी पाऊल उचलत आजपासून लॉकडाऊन शिथिल केलं. मात्र हे करतानाच दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन करायचं आहे. तसं न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बाजारपेठ सुरू झाल्याने लोकांनीही खरेदीसाठी एकच गर्दी केलेली बघायला मिळाली. कोरोना संकटामुळं आर्थिक कोंडी झालेले व्यावसायिक मात्र काहीसे सुखावले असल्याचं दिसून आलं. आता ही परिस्थिती किती दिवस कायम राहते, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here