चिमूर तालुका प्रतिनिधी, सुरज कुळमेथे
चिमूर तालुक्यात रविवारी पहाटे दोनतास चक्रीवादळ , मेघ गर्जना सह गारपिटचा पाऊस पडल्यामुळे नेरी येथील जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार यांच्या नेरी येथील निवासस्थानी असलेल्या झाडावर शेकडो चिमण्याचा बसेरा होता पण रात्री चक्रीवादळ व पाऊस ,गारपिटीने मृत्यूमुखी पडल्या तर अनेक जखमी चिमण्यांना सुद्धा जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार यांनी घरगूती उपचार करीत जीवदान दिले .
नेरी शिरपूर जिल्हापरिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार यांचे नेरी येथे घर असून घरी बगीचा असून विविध फुल व फळांची झाडे आहेत मागील अनेक वर्षांपासून चिमणी पाखरे हे त्या झाडावर वास्तव्याने राहत होते परंतु रविवारी पहाटेच्या झालेल्या चक्रीवादळी, गारपीट पावसाने शेकडो चिमण्या मृत्यूमुखी पडल्या होत्या जेव्ह सकाळी उठले तर त्यांना मृत्युमुखी पडलेल्या चिमण्यांचा सडा पडलेला दिसला तेव्हा मनोज मामीडवार गहिवरले त्यातील काही चिमण्या गंभीर अवस्थेत जिवंत दिसल्या गरम पाणी ने पुसून व घरगुती उपाय करून अनेक चिमण्याना त्यांनी जीवदान दिले .