वणी येथील ती महागडी दारू अखेर गेली कुठं?

0
112
Advertisements

चंद्रपूर/वणी – देशात कोरोनाच्या कहरमुळे संपूर्ण व्यापार ठप्प पडला आहे, देश आर्थीकदृष्ट्या मागे जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने दारूच्या माध्यमातून महसूल उभा करण्याचा निर्णय घेतला.
सोशल डिस्टनिंग चे सर्व नियम पाळत 6 मे ला देशातील दारूचे दुकाने सुरू करण्यात आले, 2 महिन्यांनी दारू पुन्हा मिळेल यासाठी तळीरामानी हजारोच्या संख्येत गर्दी केली, शासनाचे सर्व नियमांना हुलकावणी देत दारूविक्री सुरू झाली अखेर काही जिल्हा प्रशासनाने दारूविक्री पुन्हा बंद केली.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी मध्ये सुद्धा तळीरामानी नियमांना हुलकावणी दिली, वणी येथील पार्थ वाईन शॉप मध्ये नियमांना बाजूला ठेवल्यामुळे स्थानिक आमदाराने यावर आक्षेप घेतला होता.
सध्या राज्यात चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली ह्या जिल्ह्यात पूर्णतः दारूबंदी आहे, असे असताना सुद्धा 6 मे ला चंद्रपुरातील काही तळीरामानी वणी येथे गर्दी केली व महागड्या दारूच्या पेट्याच गाडीत टाकण्यात आल्या आता ती दारू चंद्रपूरमध्ये कुणाकडे आली यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
विशेष म्हणजे वणी येथील ते वाईन शॉप राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आहे, एमएच 34 एएम 6562 या वाहनात ती महागडी दारू नेण्यात आली.
ती दारू गाडीत चंद्रपुरातील कांग्रेस कार्यकर्ता यांच्या समक्ष ठेवण्यात आली हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here