झरी मांगरुड परिसरात मोहफुल हात भट्टी पाडली धाड, 1 लक्ष 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 9 आरोपिवर गुन्हा दाखल

0
210
Advertisements

चिमूर:- सूरज कुळमेथे

चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत मोहफुल दारू विक्रेत्यांचे अच्छे दिन असल्याच्या बातम्या येत असताना चिमूर पोलीस स्टेशन ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावीत दि..5.2020 रोजी ठाणेदार स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनामध्ये गुप्त माहितीवरून झरी माँगरुड येथे मोहादारु कारवाई करीत मुद्देमाल जप्त करून 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
चंद्रपुर जिल्ह्यात असलेल्या दारुबंदीच्या पार्श्ववभूमिवर चिमुर पोलिसांनी धाड़सत्र सुरु केले असून पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यानी कोरोना विशानुचा प्रादुर्भाव सुरु असताना चिमुर शहरात वॉश आउट मोहिम राबवत झरी व माँगरुड शिवारत मोहादारु काढत असताना 9 में रोजी अधिनस्त असलेल्या अधिकारी कर्मचारी याना दिलेल्या सुचनेवरुंन ढाडी टाकल्या असता ऐकून 1 लाख 36 हजार रूपयाच्या माल पकडला असून आरोपी नामे पंढरी नामदेव चौखे , विठल मंगरु चौखे , देवीदास मंगरु चौखे , देवीदास महादेव इटनकर, अशोक चंपत नैतम, पांडुरंग सूर्यभान कुरसंगे, किशोर गोविंदा कमरे, यशवंत लहानु आत्राम, बापूराव गणेश धुर्वे सर्व रा झरी माँगरुल यांच्यावर दारुबन्दी कायद्यखाली गुन्हे दाखल करण्यात आले,
सदरची कार्यवाही ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार विलास सोनुने,, नायब पोलिस शिपाई किशोर बोढे, पोलीस शिपाई सतीश झिलपे, भारत गोंडवे, मनोज ठाकरे, शैलेश मडावी यांनी केली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here