कोरोनावर मात करून लॉकडाऊन व्यवस्थित पार पाडा, परराज्यातून येणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवन्याच्या खासदार अशोक नेते यांच्या सूचना

0
198
Advertisements

प्रतिनिधी/सूरज कुळमेथे

चिमुर:- कोरोना आजारावर मात करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून लॉकडाऊन व्यवस्थित पार पाडून नागरिक एकत्र येणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. परराज्यातून आलेल्या मजुरांवर बारीक लक्ष ठेवून त्यांना सोयी- सुविधा व जेवणाची व्यवस्था करण्याचा सूचना खास. अशोक नेते यांनी दिल्या.
खरीप हंगामाची तयारी करून नियोजन करण्यात यावे, पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, तेंदूपत्याचे कंत्राट जुन्या व जिल्ह्यातील ठेकेदारांना देऊन तात्काळ तेंदू हंगाम सुरू करण्यात यावा, व मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करुन त्यांना रोजगार देण्यात यावा व कामाची मागणी करावी अश्या सूचना बैठकीत खासदार अशोक नेते यांनी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना दिल्या. मिरची तोडण्यासाठी आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्यात गेलेले मजूर मोठया प्रमाणात परत येत आहेत त्यांना प्रशासनाच्या वतीने गावाबाहेर शाळेत व इतर विविध ठिकाणी कारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्या मजुरांना सर्व सोयी सुविधा देऊन जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना खास अशोक नेते यांनी केल्या.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर खासदार अशोक नेते यांनी काल दि. 7 मे 2020 रोजी मूलचेरा तालुक्यात दौरा करून येथील तहसील कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व कोरोनाच्या परिस्थितीबाबत सद्यस्थितीची माहिती जाणून घेतल यावेळी खासदार अशोक नेते यांच्या समवेत भाजपचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, भाजपचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोहळे, जिल्हा सचिव सुभाष गणपती, तालुकाध्यक्ष प्रकाशजी दत्ता, तालुका महामंत्री विधान वैद्य, तहसीलदार कपिल हाटकर, ठाणेदार पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जावेद शेख, तालुका कृषी अधिकारी दुम्पट्टीवार , प्रभारी बीडीओ लाकडे, कृषी अधिकारी, नपंचे मुख्याधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी लॉकडाऊन व्यवस्थित ठेवून कोरोना नियंत्रणासाठी परिश्रम घेण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी सर्व अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोरोना परिस्थितीबाबत माहिती विचारली असता मूलचेरा तालुक्यात अंतर्गत 700 मजूर तेलंगाणा राज्यातून परत आले असून त्यांना आश्रमशाळेत व गावाबाहेर विविध ठिकाणी कारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे तसेच मूलचेरा येथील 92 नागरिकांचा कालावधी पुर्ण झाला असून 113 राज्याबाहेरील नागरिक आहेत त्यांच्या जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात 63 रेशन दुकाने असून 28 दुकानातून नियमित व मोफत रेशनचे वाटप सुरु आहे असे तहसीलदार कपिल हाटकर यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ जावेद शेख यांनी 2 नागरिकांचे नमुने कोरोना तपासणीसाठी नागपूर ला पाठविण्यात आले असून लक्षणे दिसलेल्या नागरिकांची तपासणी करणे सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी खास.अशोक नेते यांनी सर्व कार्ड धारक व इतर नागरिकांना रेशनचे व्यवस्थित वाटप करण्यास सांगितले.MREGS ची कामे सुरू करून मजुरांना रोजगार देऊन नवीन कामे सुरू करावी रस्त्याची मंजूर व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना यावेळी खास अशोक नेते यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here