त्या बेवारस रेती साठ्याचा तस्कर कोण?, प्रशासनाची कारवाई नाही

0
32
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता 

घुग्गुस – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील वर्धा नदीच्या चिंचोली घाट,नकोडा घाट, घोडा घाट, बेलसणी घाट,व नायगाव घाट,या रेती घाटाचा दोन वर्षापासून लिलाव झालेला नाही. कोरोना या संसर्गजन्य वायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आली तरीही बांधकाम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कामाकरिता वर्धा नदीतून अवैधरित्या रेती तस्करी करून रुपये 1500 प्रति ट्रॅक्टर विकल्या जात आहे. तर काही तस्कर नदीतून मशीनच्या सहाय्याने रेती उचल करून परिसरात साठवून ठेवत असल्याची ओरड आहे. मात्र वर्धा नदीच्या घाटातून मोठ्या प्रमाणात रात्रौ-दिवस रेती उपसा सुरू असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल डूबत आहे. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली तरी याकडे तलाठी,व मंडळ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाचे रेती तस्कराला आशीर्वाद असल्यामुळे अवैधरित्या रेती तस्करी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र मागील दोन वर्षांपासून वर्धा नदीच्या घाटावर दिसून येत आहे.रेती तस्कर दिवस-रात्र वर्धा नदीतुन रेतीचा उपसा करून नकोडा व चिंचोली घाट परिसरात 1500 ट्रिप, नकोडा येथील जानकी राम मंदिरा जवळ 100 ट्रिप, व वेकोलिच्या टॉवर जवळ 200 ट्रिप रेतीचा साठा जमा करून ठेवला आहे प्रशासनानी हा रेती साठा जब्त करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

बेवारस स्थितीत साठवणूक करून ठेवलेली ती रेती कुणाची? ती बेवारस रेती तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण हे अजूनही समजण्याच्या बाहेर आहे,  इतक्या मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली असताना प्रशासन डोळेझाक करीत आहे का? प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here