कॅन्सरने त्रस्त महिलेने गळफास घेत केली आत्महत्या

0
28
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – शहरातील सुभाष नगर परिसरात सकाळी 11 वाजेदरम्यान एका वृद्ध महिलेचं शव गळफास घेतल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार कलावती रामदास नाथर वय 61 वर्षे ही वृद्ध महिला सकाळी 7 वाजता घरून बाहेत निघाली होती.
4 तास झाल्याने ती वृद्ध महिला घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली असता सुभाष नगर येथील निलगिरीच्या झाडाला त्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
ती महिला मागील काही महिन्यांपासून कॅन्सरने त्रस्त होती, वृद्धापकाळात कॅन्सर सारख्या आजारावर मात करणे शक्य नव्हते म्हणून त्या महिलेने गळफास घेतला असावा अशी शहरात चर्चा आहे.

पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here