धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, आमची दखल घेतल्याबद्दल – आशिष खोब्रागडे

0
35
Advertisements

सिंदेवाही – मागील 4 महिन्यापासून तेलंगणा राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर कामाकरिता गेले होते यादरम्यान देशात कोरोना विषाणूने कहर केला असता संपूर्ण देश, राज्य पूर्णतः लॉकडाउन करण्यात आले, त्यामुळे बाहेर राज्यात गेलेले मजूर हे तिथेच अडकले होते.
या कठीण काळात त्या मजुरांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था नव्हती, हा सर्व प्रकार त्या मजुरांनी आपल्या स्वगावी असलेल्या नातेवाईकांना सांगितला आम्हाला इथून बाहेर काढा अशी आर्त हाक ते मजूर देत होते.
नाचनभट्टी येथील खोब्रागडे दाम्पत्य सुद्धा तेलंगणा येथे मजुरीसाठी गेले होते परंतु सिंदेवाही इथं त्यांचा मुलगा आशिष यांनी आई बाबाला धीर दिला, व क्षणाचाही विलंब न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांचेशी संपर्क साधला.
लगेच दुसऱ्या दिवशी मुंबई वरून युवासेनेचे रुपेश कदम यांनी दूरध्वनी द्वारे आशिषकडून संपूर्ण माहिती घेतली.
कदम यांनी चंद्रपूर जिल्हा युवा सेना समनव्यक निलेश बेलखेडे यांना सदर माहिती देत जिल्हाधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करून तात्काळ त्या मजुरांची माहिती द्यायला सांगितले.
बेलखेडे यांनी सिंदेवाही येथील कार्यकर्त्यांना आशिष खोब्रागडे यांची भेट घेण्यास सांगून त्यांना मदत करण्यास सांगितले.
ते सर्व मजूर आज तब्बल 5 महिन्यानंतर आपल्या स्वगावी पोहचले असता सर्वांना विलीगिकरणात ठेवले आहे.
आपले आई बाबा स्वगावी पोहचले व आपल्या समस्येची मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ दखल घेतली म्हणून त्यांचे व रुपेश कदम, निलेश बेलखेडे यांचे आभार आशिष ने मानले.
कोरोनाच्या या लढयात मुख्यमंत्री ठाकरे ज्या प्रमाणे काम करीत आहे ते वाखण्याजोगे आहे, आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहो म्हणून आशिष ने पुढील वाटचालीच्या मुख्यमंत्री ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.सिंदेवाही – मागील 4 महिन्यापासून तेलंगणा राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर कामाकरिता गेले होते यादरम्यान देशात कोरोना विषाणूने कहर केला असता संपूर्ण देश, राज्य पूर्णतः लॉकडाउन करण्यात आले, त्यामुळे बाहेर राज्यात गेलेले मजूर हे तिथेच अडकले होते.
या कठीण काळात त्या मजुरांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था नव्हती, हा सर्व प्रकार त्या मजुरांनी आपल्या स्वगावी असलेल्या नातेवाईकांना सांगितला आम्हाला इथून बाहेर काढा अशी आर्त हाक ते मजूर देत होते.
नाचनभट्टी येथील खोब्रागडे दाम्पत्य सुद्धा तेलंगणा येथे मजुरीसाठी गेले होते परंतु सिंदेवाही इथं त्यांचा मुलगा आशिष यांनी आई बाबाला धीर दिला, व क्षणाचाही विलंब न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांचेशी संपर्क साधला.
लगेच दुसऱ्या दिवशी युवासेना प्रमुख,मंत्री. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई वरून युवासेनेचे रुपेश कदम यांनी दूरध्वनी द्वारे आशिषकडून संपूर्ण माहिती घेतली.
कदम यांनी चंद्रपूर जिल्हा युवा सेना समनव्यक प्रा. निलेश बेलखेडे यांना सदर माहिती देत जिल्हाधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा करून तात्काळ त्या मजुरांची तेलंगाणा येथे संपर्क करून माहिती द्यायला सांगितले.
निलेश बेलखेडे यांनी सिंदेवाही येथील देवा मंडलवर, तालुका प्रमुख शिवसेना व कार्यकर्त्यांना आशिष खोब्रागडे यांची भेट घेण्यास सांगून त्यांना मदत करण्यास सांगितले.
ते सर्व मजूर आज तब्बल 5 महिन्यानंतर आपल्या स्वगावी पोहचले असता सर्वांना विलीगिकरणात ठेवले आहे.
आपले आई बाबा स्वगावी पोहचले व आपल्या समस्येची मा. मुख्यमंत्री ठाकरे,मा. आदित्य ठाकरे यांनी तात्काळ दखल घेतली म्हणून त्यांचे व रुपेश कदम, निलेश बेलखेडे यांचे आभार आशिष ने मानले.
कोरोनाच्या या लढयात मुख्यमंत्री ठाकरे ज्या प्रमाणे काम करीत आहे ते वाखण्याजोगे आहे, आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहो म्हणून आशिष ने पुढील वाटचालीच्या मुख्यमंत्री साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here