गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” विषाणूने अख्ख्या जगाला वेठीस धरले आहे.इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला ही मोठ्याप्रमाणात धक्का बसला असून या विषाणूने कित्येकांचे बळी घेतले आहे.परिस्थीतीची गंभीरता लक्षात घेता भविष्यात रक्ताची कमतरता भासू शकते असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याकरीता मोठ्याप्रमाणात रक्तदान करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून रक्तदान केले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच श्रेणीत 8 मे रोजी गडचांदूर भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.यावेळी जिल्हा पशु संवर्धन सभापती सुनील उरकुडे,सतीष धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.एकुण 34 रक्त दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या लढ्यात शासनाला सहकार्य दर्शविले.रक्त संकलन अधिक्षक पवार व त्यांच्या चमूने केले.सदर शिबीरात शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.शिवाजी सेलोकर,सतीष उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,रोहन काकडे,संदीप शेरकी आदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे संतोष मोतेवाड,सुयोग कोंगरे,प्रतीक सदनपवार,वैभव राव,वैभव पोटे,कुणाल पारखी,अज़ीम बेग यांनी सदर शिबीराचे आयोजन केले होते.सत्ता कुणाची का असेना भाजप मात्र जनहितासाठी सदैव तत्पर असल्याचे या निमित्ताने अनुभवता आले.हे मात्र विशेष.
कोरोनाच्या धर्तीवर भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न. गडचांदूर येथे आयोजन, 34 रक्तदात्यांनी केले रक्तदान
Advertisements