चंद्रपूरचा “लाल” यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री

0
91
Advertisements

चंद्रपूर – अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार कांग्रेसचे महासचिव व संगठन प्रभारी केसी वेणूगोपाल यांच्या द्वारे एनएसयुआय ची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली.
या राष्ट्रीय कार्यकारिणीत एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव म्हणून चंद्रपुरातील रोशन लाल बिट्टू यांची नियुक्ती करण्यात आली.
रोशन लाल हे झारखंड राज्याचे प्रभारी आहे, याआधी ते छत्तीसगड, उडीसा व दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघाचे राज्य प्रभारी म्हणून काम बघितले आहे.
चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे रोशन यांनी आतापर्यंत विद्यार्थी संघटनेत अनेक पदे भूषविली आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्येवर आजपर्यंत रोशन लाल ने अनेक आंदोलने करीत यश मिळविले त्यांची पक्षाची जबाबदारी व पक्षनिष्ठा बघता कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, एनएसयुआय राष्ट्रीय प्रभारी रुची गुप्ता, एनएसयुआय राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी रोशन लाल यांना एनएसयुआय राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली.
राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रोशन लाल यांनी कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ मला मिळाले असून याबद्दल मी समस्त कार्यकर्ते यांचे आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here