शर्ती, अटिवर शहरातील व्यापार सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

0
38
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यातील काही भागांमध्ये व्यापार सुरु झाला आहे. मात्र चंद्रपूरात अध्यापतरी व्यापार सुरु झालेला नाही त्यातच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या पत्नी, मुलगा आणि मूलीचा अहवालहि निगेटिव्ह आला आहे. त्यामूळे आता संचारबंदी थोडी शिथील करुन शहरातील व्यापार शर्ती, अटिंवर सुरु करावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या आहेत. आज शुक्रवारी आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेऊन कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सिल करण्यात आलेल्या परिसरातील परिस्थितीचाहि आढावा घेतला.

जवळपास दिड महिण्यानंतर चंद्रपूरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून चंद्रपूरातील संचारबंदी सक्त करण्यात आली आहे. मात्र आता कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी जवळपास सर्वांचाच अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे. विशेताह कोरोना बाधित रुग्णाच्या पत्नी व मुला मुलीचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हातील अनेक भागांमध्ये व्यापार सुरु करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेता आता संचारबंदी शिथिल करुन नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा द्यावा अशा सूचना आज आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्या आहे. आज आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सिल करण्यात आलेल्या भागात प्रशासनाकडून मदत कार्य पोहचविण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या भागात सर्व दुकाने बंद असल्यामूळे येथिल नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या भागात मदत कार्य सुरु असले तरी प्रशासनानेही यात मदत करावी असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले. चंद्रपूर जिल्हातील काही भागात व्यापार सुरु करण्यात आला आहे. मात्र शहरातील व्यापार अद्यापही बंद आहे. त्यामूळे याचा मोठा परिणात व्यापा-यांसह चंद्रपूरकरांवर होत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. त्यामूळे आता चंद्रपूरातील व्यापार शर्ती, अटिंवर ठरावीक वेळेसाठी सुरु करण्यात यावा अशा सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here