फेक बातमीचा परिणाम आणि त्या कट्टयावर गुन्हा दाखल

0
105
Advertisements

राजुरा – कोरोना विषाणूच्या सावटात देशात हाहाकार माजला असताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही वेब पोर्टलनी फेक बातमीचा जणू धडाकाच लावला होता.

7 मे ला चंद्रपूर जिल्ह्यात 3 कोरोना पोजीटीव रुग्ण मिळाल्याची बातमी त्या कट्टयावर प्रसारित झाली असताना प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे फोन वारंवार वाजले, या बातमीबद्दल अधिकाऱ्यांना काही कल्पना नव्हती, ती फेक बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

जिल्हाप्रशासनाने त्या कट्टयावर कारवाई करण्याचे फर्मान काढले व आज आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्या कट्ट्यावर गुन्हा दाखल झाला.

फेक बातमी प्रसारित करण्याची ही पहिली वेळ नव्हती याआधी सुद्धा अनेक प्रकारच्या फेक बातमी त्या कट्ट्याने प्रसारित केल्या होत्या, कोणतीही अधिकृत माहिती न घेता बातमी प्रसारित करण्याची इतकी धडपड कशाला असते याच भान बातमी लिहणाऱ्यांना का नाही?

सध्या जिल्हा व पोलीस प्रशासन कोरोना विरोधात लढा देत असतांना त्यांच्या कार्यावर अश्या फेक बातमीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होते, प्रशासनातर्फे अधिकृत माहिती मिळेल त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here