प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्घुस :- चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील 17 मजुर हे घुग्घुस परिसरात मजुरी करीता आलेले होते.
मात्र कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या ताळेबंदी व संचारबंदीत हे मजुर घुग्घुस परिसरात अडकून पडले.
हाताला काम नाही खायला अन्न नाही अश्या अवस्थेत हे मजुर परिवार उपासमारीच्या संकटात असल्याची माहिती घुग्घुस कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांना कळताच त्यांनी 07 में रोजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनार्थ मजुरांची भेट घेवून सर्वप्रथम त्यांची नाश्ता चहा पानी देवून आस्थेने चौकशी केली.
त्यांना स्यानीटाईज़र करण्यात आले.
मास्क वाटप करण्यात आले त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे नेवून त्यांची वैदकीय तपासणी करण्यात आली तहसीलदार साहेब यांना माहिती देवून त्यानंतर राजुरेड्डी यांच्या खाजगी वाहनातून त्यांना सावली येथे रवाना करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नकोडा उपसरपंच हनीफ शेख, राजू पोल, उपस्थित होते.