गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना”नामक व्हायरसने अख्ख्या जगाला गराडा घातला असून शासनाने सर्वत्र लॉकडाउन जाहीर केले आहे.जे जिथे आहे,तिथेच रहा असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते मात्र घराची ओढ तिव्र झाल्याने परराज्यातून ठिकठिकाणी आलेल्या मजुरांनी कोणत्याही परिस्थीतीत स्वगावी पोहोचायचे असा संकल्प करून शेकडो किमी चा पायदळी प्रवास सुरू केल्याचे सध्या पहायला मिळत आहे.प्यायला शुद्ध पाणी नाही,खायला अन्न नाही.मिळेल ते खायचे असे भयावह संकट मजुरांवर आले आहे.गडचीरोली, भंडारा,गोंदीया जिल्हातील 16 मजूर कामा निमित्त मागील तीन महिन्यापासून तेलंगणातील हैद्राबाद येथे होते.अशातच लॉकडॉउन लागल्याने हे तिथेच अडकले.आता हाताला काम नाही,जवळ पैसा नाही,याठिकाणी राहुन तरी काय करायचे.गावाकडे जाण्यास कोणतेही साधन नसल्याने अखेर यांनी हैद्राबाद वरून पायदळ प्रवास सुरू केला.रस्त्यात कुणी काही दिलेच तर खायचे व निघायचे असे करत करत हे मजुर 6 मे रोजी रात्रीच्या सुमारास गडचांदूर येथील बसस्थानक जवळ पोहोचले असता याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली.उपाशी तापाशी पायदळी आलेल्या या मजुरांना स्थानिक सारंग पेट्रोल पंप येथे नेऊन सतीष उपलेंचिवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे या भाजप कार्यकर्त्यांनी भोजनाची व्यवस्था केली. थकलेल्या उपाशी मजुरांना पोटभर जेवण मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.आजघडीला कोरोनामुळे आलेले हेफाळणीनंतरचे मोठे स्थलांतर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर “कोरोना”मुळे, हैद्राबाद वरून मजुरांचा गावाकडे पायदळ प्रवास, गडचांदूरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था
Advertisements