वेस्ट मटेरियल उचलण्यास का हटकले म्हणून युवकास मारहाण

0
190
Advertisements

चंद्रपूर – रस्त्याचे वेस्ट मटेरियल उचलू नका असे हटकले म्हणून एका युवकास कंत्राटदाराच्या भावाने मारहाण केल्याची घटना 7 मे ला स्थानिक तुकुम येथील गुरुद्वाराचे मागे घडली.

सिएचएल हॉस्पिटल ते सरकारनगर पर्यन्त मार्गाचे काम काही महिन्यांपूर्वी झाले होते, त्या मार्गाचे वेस्ट मटेरियल खांडरे नामक कंत्राटदाराने गुरुद्वारा तुकुम मागील परिसरातील पटांगणात टाकले होते, मागील काही दिवसांपासून ते वेस्ट मटेरियल सौरभ खांडरे हा विकायला लागला होता, ते मटेरियल विकण्यासाठी शासनाची परवानगीची गरज असताना बेकायदेशीर रित्या हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता.

Advertisements

गुरुद्वाराच्या मागे राहणाऱ्या काही युवकांनी ते मटेरियलची पटांगण परिसरात विल्हेवाट लावून मुलांना खेळण्यासाठी जागा व्हावी यासाठी प्रयत्न सुद्धा केला, परंतु सौरभ खांडरे ने ते मटेरियल सतत 7 ते 8 रुपयात विकणे सुरू ठेवले, आज 7 मी रोजी शिवा वजरकर नामक युवकाने सौरभला ते मटेरियल उचलण्यास हटकले असता सौरभ शिवाच्या अंगावर धावून गेला व त्याला मारहाण सुरू केली.

वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असताना शिवसेना कार्यकर्ते स्वप्नील काशीकर हे त्याठिकाणी पोहचले व तो वाद सोडविण्याची विनंती केली परंतु सौरभ हा काही ऐकायला तैयार नव्हता, त्याने कुणाचेही न ऐकले व काशीकर यांचेवर सुद्धा हात उचलण्याचा प्रयत्न केला, काशीकर यांनीही जशात तशे उत्तर दिले.

हा वाद काही वेळात रामनगर पोलीस स्टेशनला पोहचला असता पोलिसांनी वजरकर, काशीकर व खांडरे यांच्यावर 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

स्वप्नील काशीकर यांनी प्रशासनास विनंती केली की शासनाच्या कामाचे मटेरियल बेकायदेशीररित्या विकणाऱ्यावर कडक कारवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here