श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मुलांसाठी चित्रकला स्पर्धा दोन गटात होईल स्पर्धा, शहरी-ग्रामीणसाठी पुरस्कार

0
176
Advertisements

चंद्रपूर, : सध्या जगभरात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या परिस्थितीला चित्रबद्ध करण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणि मोहित मोबाईल यांच्या पुढाकाराने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी अ आणि ब असे दोन गट पाडले आहेत. अ गटात पाचवी ते सातवी आणि ब गटात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यात चंद्रपूर शहर आणि ग्रामीण अशा दोन विभागातील पहिल्या तीन स्पर्धकांना मोहित मोबाईलच्या वतीने योग्य पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेचा विषय “कोरोना युद्ध आणि बाल मन” असा आहे. प्रवेशिका म्हणजेच विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेली छायाचित्रे 20 मे पर्यंत सादर करायची आहेत. ही चित्रे थेट पत्रकार संघाच्या मेलवर द्यायची आहेत. प्रवेशिकेवर विद्यार्थ्याचे नाव, गाव, शाळेचे नाव, वर्ग आणि मोबाईल क्रमांक द्यायचा आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशिका म्हणजेच चित्र pressclub.chandrapur@gmail.com या मेल आयडीवर पाठवायचे आहे. त्यासाठी अंतिम तारीख 20 मे आहे. तर मग बाल मित्रानो उचला ब्रश आणि साकार करा तुमच्या मनातील कोरोना युद्ध आणि पाठवा आम्हाला. अधिक माहितीसाठी पत्रकार संघाचे सदस्य जितेंद्र मशारकर (9325242852) आणि देवानंद साखरकर (9822469436 )यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here