Advertisements
नागभीड – नागभीड शहरातील शिवनगर निवासी मकबूल मुनिरखां पठाण (22 वर्षीय) याचा परिसरातीलच उमर फारुख शेख, सुनील मांढरे, हरिणारायन मांढरे यांच्यासोबत 10 दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले, त्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन 6 मे रोजी मकबूल वर शस्त्राने हल्ला चढवीत त्याला मारहाण केली, या मारहाणीत मकबूलला गंभीर दुखापत झाली, उपचारादरम्यान मकबुलचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील तीन आरोपींना नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.
वादाचे कारण मृतक हा आरोपींना दारू पिऊन त्रास देत होता, त्यांना वारंवार धमकी व पैसे मागायचा याची तक्रार आरोपीनी पोलिसांना दिली असता त्यांनी बंदोबस्त असल्या कारणाने लक्ष दिले नाही अखेर हा गुन्हा आरोपींकडून घडला असल्याचे बोलले जाते.