गडचांदूर/मूम्ताज़ अली:-
चीन पुरस्कृत “कोरोना व्हायरसने” जगभरात हाहाकार माजवला असून अनेक विकसित राष्ट्रांना या जीवघेण्या विषाणूने अक्षरशः हादरून सोडले आहे.अख्ख्या जगभरातील लाखो नागरिकांना याची लागण झाली तर हजारो निष्पापांचा मृत्यू झाला आहे.याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन(संचारबंदी) जाहीर केले आहे.”घरी रहा,सुरक्षीत रहा,नियमितपणे मास्कचा वापर करा” असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गडचांदूर येथील एका पेट्रोल पंपावर “मास्क लावल्या शिवाय,पेट्रोल मिळणार नाही” अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले.पेट्रोलची रक्कमेला सुद्धा येथील कर्मचारी हात लावत नाही.यासाठी एक डब्बा ठेवण्यात आला आहे त्यात ग्राहक स्वत: पैसे टाकतात आणि यासोबतच प्रत्येक ग्राहकांच्या हातावर सॅनिटायजरचा फवारा मारला जातो.अशा पद्धतीने कोरोना संसर्गापासून स्वत: व नागरिकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.इतरांनी सुद्धा याचा बोध घेणे,काळाची गरज बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
मास्क लावल्या शिवाय “पेट्रोल” मिळणार नाही, गडचांदूर पेट्रोलपंप संचालकाचा “कोरोना” प्रतिबंधक उपाय, सोशल डिस्टंसींग, सॅनिटायजर इतर नियमांचे काटेकोरपणे पालन
Advertisements