पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची कोविड-19 नमुने तपासणी प्रयोगशाळेला (VRDL) भेट

0
107
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपुरात मुल रोड वरील वसाहतीत कोरोना पाॅझीटीव रूग्ण आढळल्याचे कळताच चंद्रपूर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक या स्वास्थ्य अधिकाऱ्यांकडुन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी माहिती घेतली व पुढील करावी लागनारी दक्षता यावर चर्चा केली. त्याचवेळेस चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे VRDL लॅब लवकर सुरू होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डाॅ. मोरे यांनी दिली. चर्चेनंतर VRDL लॅबला अधिष्ठाता डाॅ. मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ राठोड व अन्य वरीष्ठ डाॅक्टर्स मंडळी यांचेसोबत भेट दिली.

या लॅबला केंद्र सरकारच्या ICMR ने ही मान्यता दिली असुन उपकरणे लवकरच येतील व त्वरीत लॅब सुरू होणार अशी माहिती अधिष्ठाता यांनी दिली. नागपूर नंतर चंद्रपुरातच ही कोरोणा विषाणुची तपासनी करणारी लॅब राहणार आहे या बद्दल वैद्यकीय अधिकारी व कर्मच्याऱ्यांचे हंसराज अहीर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here