आमदार जोरगेवार ऍक्शनमध्ये, खाजगी कापूस खरेदी पाडली बंद, सीसीआय कापूस गती देण्याच्या सूचना

0
106
Advertisements

चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर सिसिआय अंतर्गत कापूस खरेदी सुरु करण्यात आली. मात्र कापूस विक्रीसाठी जवळपास 4 हजार शेतक-यांनी नोंदणी केली असतांना, दिवसाला केवळ शेतकऱ्याच्या 10 ते 15 कापसाच्या गाडया सिसिआय अंतर्गत खरेदी केल्या जात होत्या. उरलेल्या गाडया नाईलाजास्तव कवडीमोल भावाने खाजगी व्यापा-यांना विकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली होती. ही बाब लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी व्याप्यारांकडून शेतक-यांची लूट थांबवीण्यासाठी  सिसिआय कापूस खरेदी केंद्राला  भेट देवून खाजगी कापूस खरेदी बंद पाडली असून सिसिआय अंतर्गत कापूस खरेदीला गती देण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी आ. जोरगेवार यांनी सिसिआय चे अधिकारी अजय कुमार यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा केली आहे. त्यांनी ही उदया पासून सिसिआय अंतर्गत 40 ते 50 कापसाच्या गाडयांची खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.

    कोरोनाचे संकट लक्षात घेता सिसिआय अंतर्गत सुरु असलेली कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.  परिणामी व्यापा -यांनी संधी साधत शेतक-यांचा कापूस कवडीमोल भावात विकत घ्यायला सूरुवात केली . त्यामूळे शेतक-यांची चांगलीच लुट होत होती. अवकाळी पावसाने शेतक-यांच्या कापसाच्या बोंडाला डाग लागल्याने त्याचे पहिलेच आर्थिक नूकसाण झाले आहे. आता कसा बसा वाचलेला कापूस विक्रीसाठी काढला असता त्याची व्यापा-यांकडून लूट केल्या जात असल्याचे लक्षात येताच सिसिआय अंतर्गत कापूस खरेदी सुरु करण्यात यावी  अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीच्या पुर्ततेसाठी आ. जोरगेवार विविध मंत्री व आमदारांच्या सतत संपर्कात होते. परिणामी प्रशासनाच्या वतीने सिसिआय अंतर्गत कापूस खरेदी सुरु करण्यात आली. यासाठी सिसिआय अंतर्गत कापूस विक्री करणा-या शेतक-यांची नोेंद करण्यात आली. यावेळी जवळपास 4 हजार शेतक-यांनी कृषी उत्पन्न बाजार समीतीत नोंद केली. त्यानूसार सिसिआय अंतर्गत कापूस खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र 4 हजार शेतक-यांनी कापूस विक्रीकरिता नोंदनी केली असतांनासूध्दा सिसिआय अंतर्गत दिवसाला शेतकऱ्यांच्या  कापसाने भरलेल्या केवळ 10 ते 15 गाडयांमधील कापूस खरेदी केल्या जात आहे. परिणामी उरलेला कापूस शेतक-यांना खाजगी व्यापा-यांना कवडीमोल भावात विकावा लागत होता. कापसाची प्रतवारी घसरल्याचे सांगत व्यापारी शेतक-यांचे पाढरे सोने लूटत असल्याचेच चित्र दिसून येत आहे. ही बाब लक्षात येताच आज आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील सिसिआय केंद्राला भेट दिली. सिसिआय अंतर्गत केवळ 10 ते 15 गाडया कापूस का खरेदी केला जात असल्या बाबत विचारना केली असता कामगार मिळत नसल्याचे असमाधानी उत्तर देण्यात आले. खाजगी व्यापा-यांना कामगार मिळतात तर सिसिआयला का नाही असा प्रश्न यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित करत खाजगी कापूस खरेदी बंद पाडली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवा यांनी सिसिआय चे अधिकारी अजय कूमार यांच्याशीही दूरध्वनी वरुन संपर्क साधत सिसिआय अंतर्गत कापूस खरेदीची गती वाढवीण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. उदया बूधवार पासून शेतक-यांच्या दिवसाला 40 ते 50 कापसाच्या गाडया सिसिआय अंतर्गत खरेदी केल्या जाईल असे आश्वासनही यावेळी सिसिआयच्या वतीने देण्यात आले. यावेळी धानोरा, पिपरी, मारडा, या गावांसह ईतर गावातील शेतक-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here