ब्रेकिंग बातमीच्या नादात अफवेचा बाजार, कोरोना पोजीटीव रुग्ण संशयास्पद

0
119
Advertisements

चंद्रपूर – देशात कोरोनाचा कहर सुरू असताना सध्या कोरोनाबाबत अफवा पसरविण्याचं काहीनी सुरू केलेल आहे, कोरोना विषाणूबाबत कुणीही अफवा पसरविल्यास विविध ठिकाणी कारवाई होत आहे, असे असताना पण बातमीची अधिकृत माहिती न घेता ब्रेकिंग न्यूज च्या नादात अफवेचा बाजार गरम करणे सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातून 3 कोरोना पोजीटीव रुग्ण चंद्रपुरातील गडचांदूर येथे आले व ते अनेक लोकांच्या संपर्कात आले अशी खोटी बातमी काहींनी लावली असता जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली.

पोलीस प्रशासनाने त्या वृत्ताचे खंडन केले की ते नागरिक संशयास्पद होते, त्यांचा कोरोना पोजीटीव अहवाल नांदेड प्रशासन करणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे, त्या खोट्या वृत्तावर पोलीस कारवाई करणार असल्याची सुद्धा माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

पोलीस प्रशासनाने नागरीकांना आवाहन केले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे सदेश किंवा माहीती खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here