नागरिकांच्या मदतीसाठी पुन्हा धावली “खाकी” महामार्गावरील झाड हटवून रहदारी सुरू, गडचांदूर पोलिसांची तत्परता

0
187
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षेसाठी अगोदरच पोलिस रात्रंदिवस जीवाचे रान करताना दिसत आहे.कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागन झाल्याचे चित्र आहे. नागरीकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारी “खाकी” आज पुन्हा धावून आली आहे. कोरपना तालुक्यात 6 मे रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे आलेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले.यामुळे काही ठिकाणी शेळ्या मेल्या तर काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.याच श्रेणीत गडचांदूर शहरा लगत असलेल्या महावितरण कार्यालया जवळ आज आलेल्या वादळी वार्‍यामुळे एक झाड मुख्य मार्गावर कोसळल्याने अंदाजे एक तास वाहतूक पूर्णपणे बंद पडली.वाहनांच्या रांगच रांग लागली होती.ही माहिती मीळताच गडचांदूर पोलिस स्टेशनचे बोरीकर,महन्तो, भटलाटे,विश्वनाथ चौधरी, अमोल कांबळे,कमलेश ह्या पोलिस कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी जावुन ट्रॅक्टरच्या साह्याने झाडाला हटवून रस्ता खुला केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तत्परतेने केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here