प्रतिनिधी/सूरज कुलमेथे
चिमुर:- चिमूर तालुक्यातील भिसी व परिसरात आज बुधवारी ६ मेला दुपारी ४वाजता दरम्यान चक्रीवादळ व जोरदार पाऊस आल्याने एका राईस मिलची जीर्ण भीत दुकानांवर भिंत कोसळली असून त्यात एक शेख शगिर शेख हैदर वय ४५ रा भिसी या इसमाचा दबून मृत्यु झाला असून यात तीन जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केले आहे .४वाजताच्या सुमारास भिसी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळ व सोसाट्याचा पाऊस आला असता वादळापासून बचाव करण्यासाठी दुकान चाळीत लपण्यासाठी गेले असता त्यांच दुकान चाळीवर एका राईस मिलची भली मोठी लांब लचक भिंत त्या चाळीवर कोसळली त्यामुळे दुकान चाळीतील व्यापारी व तो इसम त्या जमीनदोस्त मलब्यात दबले त्यातील शेख शगीर हैदर शेख वय ४५ वर्ष याला उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे उपचारासाठी आणले असता तपासणी केली असता डाँटर यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले .
यात किराणा दुकानदार प्रकाश पंचम मेश्राम वय ४५ वर्ष हे गंभीर जखमी असून त्यांना नागपुरात उपचार सुरू केले आहे तर दुसरे किराणा दुकानदार दिनेश देशकर वय ४२ वर्ष व अर्चना दिनेश देशकर वय ३८ वर्ष हे पती पत्नी ही किरकोळ जखमी झाले आहे .तसेच बाजूचे हार्डवेअर दुकानदार विजय खोब्रागडे आधीच दुकान बंद करून गेले होते त्यामुळे त्याचे दुकानासह चार दुकान जमीनदोस्त झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे .त्या जीर्ण जुन्या भिंती मुळे चार दुकान जमीनदोस्त झाले असून परिसरातील दोन शाळा चे छत उढुन पडले असून अनेक ठिकाणी चक्रीवादळाने घरे ,झाडे कोसळून पडली असल्याची माहिती आहे .जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले पण यात एकाचा मृत्यू झाला.