कोरपना तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाचे थैमान, अनेकांच्या घरांचे उडाले छप्पर

0
89
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
दिवसभर उन्हाचे चटके देत अचानकपणे वादळी वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसाने कोरपना तालुकावासीयांना अक्षरशः झोडपून काढले.दुपारी अंदाजे 3 वाजताच्या सुमारास आलेल्या वारा आणि पावसाचा जोर इतका जबरदस्त होता की अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले.यामुळे घरातील अन्नधान्यसह मौल्यवान वस्तूं पाण्यात भिजल्या.जवळपास अर्धा तास याचा आतंक सुरूच होता.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून अन्नधान्यसह घरातील मौल्यवान वस्तूंचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here