Advertisements
प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन करण्यात आले असताना सर्व प्रकारची वाहतूक शासनाने बंद केली होती, देश हा आर्थिक डबघाईस येऊ नये यासाठी लॉकडाउन मध्ये शिथिलता देण्यात आली व काही प्रमाणात वाहतूक सुरू केली.
स्थानिक घुग्गुस शहराजवळ सुभाष नगर महामार्गावर ट्रक क्रमांक एमएच 28 बीबी 2936 याचा बेल्ट अचानक तुटल्याने ट्रक मार्गावर असणाऱ्या दुभाजकावर आदळला, या ट्रक मध्ये चंद्रपूर मधून कोळसा बुलढाणा जिल्ह्यात जात होता.
अचानक वाहनांचा अपघात झाल्याने पूर्ण कोळसा मार्गावर विखरून पडला, मार्गावरील वाहतूक सुरू असती तर मोठी दुर्घटना घडली असती.