कोरपना – तालुक्यात बुधवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अतोनात पावसामुळे मोठे नुकसान झाले.
विज पडल्याने तालुक्यातील सोनुर्ली (वनसडी)
येथील शेत शिवारातील अकरा शेळ्या जागीच मृत्यू पावल्या. तर दोन गंभीर रित्या जखमी झाल्या. पिंपळगाव येथे दोन बैलावर वीज कोसळली . निजाम गोंदी येथे एका बैलावर वीज पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पिपरी (नारडा) येथील शेत शिवारातील दोन बैलाचे गोठ्यावरील वरील टिन पत्रे उडाली. कोरपना शहरात वादळामुळे टेलिफोन एक्सचेंज मधील महाकाय वृक्ष कोसळून दोन विद्युत खांब कोसळले. सुदैवाने यात मोठी प्राणहानी टळली. राजीव गांधी चौक परिसरात एका पान ठेल्याचे टिन पत्रे उडाली. तसेच इंजापुर, सोणूर्ली , नारंडा येथे वृक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली त्यामुळे अनेक विद्युत खांब कोसळली. यात विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले. वनसडी जवळ मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळल्याने चंद्रपूर आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग चार तास गप्प राहिला. यामुळे सिमेंट च्या वाहनाची रांगच रांग लागली. वनसडी येथील केळीच्या बागेचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. सोनुर्ली येथील एका जिनिंगच्या मजुरांचे तात्पुरते निवास शेड च्या टिन पत्रे उडली गेली. तसेच नजीकच्या धाब्याचे टिन पत्रे उडाली. लालगुडा गावात अनेक घरांचे छप्पर उडाले.
कोरपना तालुक्यात वादळी पावसाचे आकांत-तांडव, वीज पडून 11 शेळ्या ठार
Advertisements