राज्यात कापुस व चना खरेदीत राज्य सरकारच्या नियोजना अभावी शेतकऱ्यांची  लुट तथा शेतकरी हवालदील:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

0
120
Advertisements

चंद्रपूर:- महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सि.सि.आय तर्फे 5 एप्रील पासुन कापुस खरेदीचा निर्णय तथा राज्यात कळवुनही राज्यातील कापुस खरेदीबाबत सावळागोंधळ सुरू असल्याने शेतक ऱ्यांना हमीभावाच्या लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सर्वत्र लुट सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचप्रमाणे नाफेडतर्फे 2 मार्च 2020 ला 20 मार्च पासुन रब्बी उत्पादन खरेदी करण्याचे निर्देश दिले असतांना खरेदी होत नसल्याने चना उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि या स्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून राज्य सरकारने याची दखल घेऊन चना व कापुसखरेदी सुरळीत सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे अशी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुचना केली.
नाफेडने शेतकऱ्यांकडुन चना खरेदी करण्याचे निर्देश आधी देऊनही खरेदी करण्यासाठी राज्य फेडरेशन व कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे खरेदी सुरू करण्यात आली नसल्याचे ध्यानात आनुन देत त्याचप्रमाणे सि.सि.आय ने कापुस खरेदीसाठी वारंवार पत्र देऊन खरेदीसाठी आवश्यक पूर्वतयारी व ग्रेडर उपलब्ध करून देऊनही आवश्यक त्याप्रमाणे खरेदी करण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत असुन त्यांना आपल्याकडील कापुस, चना व तुर खाजगी व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावी लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शोषनाला राज्य सरकार चे शेतकऱ्यां प्रती उपेक्षेचे   धोरन जबाबदार असल्याचे अहीर यांनी साधार सांगीतले.
पूर्व तयारी न करता व शेतकऱ्यांकडला कापुस, चना व तुर हमीभावात खरेदी व्हावी याकरीता राज्य सरकार आणि अंतर्गत यंत्रना पुरेपुर कार्यरत नसल्याने आपले उत्पादन विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदनी करीत असुन त्याप्रमाणात त्यांच्या उत्पादनाची खरेदी होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांना अकारन आर्थिक अडचनीच सामना करावा लागत आहे. सि.सि.आय तर्फे सुरू असलेल्या खरेदी केंद्रवर केवळ 15 ते 20 गाड्या कापुस खरेदी होत असुन जिथे सरळ खरेदी सुरू आहे त्याठीकाणी मात्र 50 च्या वर गाड्या खरेदी होत आल्याचे वास्तव सांगत यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत आपले उत्पादन विकण्याची वेळ आली असुन शेतकरी राज्य शासनाच्या भुमिकेमुळे नाडवला जात असल्याचे सार्वत्रीक दिसत असुन शेतकऱ्यांची अडवणुक केवळ शासनाच्या धरसोड धोरनामुळे होत असुन शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे अहीर यांनी सागीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here