क्रीष्णानगर वासीयांच्या हाकेला आमदार जोरगेवारांची साथ, वार्डवासीयांना भाजीपाला वाटप

0
98
Advertisements

चंद्रपूर – शहरातील क्रिष्णा नगर भागात कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने सतर्कता म्हणून प्रशासनाच्या वतीने क्रिष्णा नगर सह संजय नगर व केरला कॉलनी परिसर सिल करण्यात आला आहे. परिणामी येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या भागात भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.

संपुर्ण देशात कोरोनाचा थैमाण सुरु असतांना चंद्रपूर जिल्हा अनेक महिने कोरोनामूक्त राहिला मात्र चार दिवसांपूर्वी कोरानाचा पहिला रुग्ण शहरातील क्रिष्णा नगर भागात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परिणामी सुरक्षेच्या दृष्टिकोणातून क्रिष्णा नगर सह सभोवतालचे संजय नगर व केरला कॉलनी प्रशासनाच्या वतीने सिल करण्यात आली आहे. या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरच्या नागरिकांना परिसरात येण्यास व आतील नागरिकांना परिसराच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामूळे या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. अनेकांच्या घरचा भाजीपाला व ईतर आवश्यक सामृग्री संपल्या आहेत. हि बाब काही स्थानीकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी क्षणाचाही विलंब न करता येथील नागरिकांना शक्य ती मदत पोहचवीण्याच्या सुचना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्यात सुचना प्राप्त होताच यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या भागात भाजीपाला पोहचवीला आहे. हा भाजीपाला या भागात पोहचताच या सर्व भाजीपाल्यांच्या कीट तयार करण्यात आल्यात. त्यानंतर येथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या सर्व कीट संजय नगर, कृष्ण नगर व केरला कॉलनी या भागातील गरजुंना घरपोच नेऊन देण्यात आल्यात. हे वाटप करत असतांना कार्यकर्त्यांकडून मास्क लावून सामूहिक अतंर पाळण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शेवटच्या गरजु पर्यंत मदत पोहचविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्यात, या भागातील नागरिकांसाठी हा काळ संघर्षाचा आहे. प्रशासनाची सक्ती ही येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामूळे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here