चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना नागरिक लॉकडाउनमध्ये घरीच बसले आहे, या फावल्या वेळात नागरिक विविध कामात आपला वेळ घालवीत आहे तर काही आपला छंद जोपासत आहे.
असाच एक छंद चंद्रपुरातील 16 वर्षीय श्रुती अलोने नामक मुलीने जोपासून कोरोना पार्श्वभूमीवर एक संदेश दिला आहे.
शहरातील घुटकाला वार्डात राहणाऱ्या श्रुतीने पेंटिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूची आजची परिस्थिती दर्शविली, भारत देश आज कोरोना विषाणूशी कसा लढा देत आहे यावर पूर्ण लक्ष देत श्रुतीने ते चित्राच्या माध्यमातून कागदावर रंगविले आहे.
श्रुती अलोने या मुलीने 2 वर्षाआधी मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे राष्ट्रीय स्प्रे पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवित चंद्रपूर जिल्ह्याचा नाव लौकिक केलं होतं.
आज कोरोना विषाणूच्या कठीण परिस्थितीत सुद्धा विविध छंद जोपासत लहान मुले सुद्धा मोठा संदेश देत आहे हा आजच्या व येणाऱ्या पिढीसाठी एक संदेशच आहे.