कोरोनायुक्त रुग्णाचा परिवार व संपर्कात येणारे व्यक्ती कोरोनामुक्त

0
160
Advertisements

चंद्रपूर – तब्बल दीड महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पोजीटीव रुग्ण मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती, प्रशासनाने रुग्ण ज्या ठिकाणी वास्तव्यास होता तो परिसर पूर्णतः सील केला व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

यामध्ये रुग्णाची पत्नी, मुलगा व मुलगी यांचे अहवाल पूर्णतः निगेटिव्ह आले, व 49 नागरिकांपैकी 37 नागरिकांचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

यामध्ये अजूनही संशय कायम आहे, कारण रुग्णाचा अहवाल चंद्रपूर जिल्ह्यात आधीच व्हायरल झाला, त्याच्या अहवालात तो महिला आहे असे दर्शविले होते परंतु प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितले की तो त्या रुग्णाचा अधिकृतच अहवाल आहे.

त्या रुग्णाला पुढच्या तपासणीसाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कोरोना चाचणी ही चंद्रपूरला होणार व याची लॅब लवकर सुरू करू असे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु लॅब अद्यपही सुरू झालेली नाही, आपल्याकडे मेडिकल कॉलेज असताना सुद्धा त्या रुग्णाला नागपुर मध्ये का पाठविण्यात आले याबाबत अजूनही शंका कायमच आहे, कारण त्याच्या परिवारातील व संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आहे तर तो रुग्ण पोजीटीव झाला कसा याबाबत अजूनही शहरवासीयांना संशय आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here