आम्ही जगायचं की मरायचं? केरला कॉलोनीमधील नागरिकांचा प्रशासनाला प्रश्न

0
44
Advertisements

प्रतिनिधी/बालू सातपुते

चंद्रपुर:- स्थानिक कृष्णानगर, केरला कॉलोनीमध्ये कोरोना पॉजिटिव रुग्ण आढळल्याने या कॉलनीसह सम्पुर्ण वार्ड प्रतिबंधित केला आहे. या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मजूर, कामगार वर्ग राहतो. लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून हे सर्व कामगार घरीच आहेत. त्यामुळे या भागात कम्युनिटी किचन सुरु करा असि मागणी कृष्ना नगर, केरला कॉलोनी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी याना निवेदनाद्वारे केली आहे,
या परिसरात कोरोनाच्याचा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने आता या समस्येत पुन्हा भर पडली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या गरीब मजुरांचे रोजचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्या रोजच्या जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गर्जाऊ वस्तूची आवश्यकता आहे. त्यामुळे या परिसरात प्रशासनाने कम्युनिटी किचनची व्यवस्था निर्माण करावी आणि येथील गरिबांच्या भुकेचा प्रश्न सोडवावा, तसेच, स्थानिक नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि गरज भागविण्यासाठी किराना स्टोअर्स नियम देऊन सुरू करण्यात यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहै,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here